• मुख्य सामग्रीवर जा
  • स्क्रीन रीडर ऍक्सेस
  • ए-
  • ए
  • ए+

सिकलसेल ऍनिमियाचे सर्वेक्षण व

आदिवासी विद्यार्थ्यांना कार्ड वाटप
श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री, एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. श्री. अशोक उईके

माननीय मंत्री, आदिवासी विकास विभाग

मा. श्री. इंद्रनील नाईक

माननीय राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग

श्री. विजय वाघमारे, (भा.प्र.से.)

माननीय सचिव, आदिवासी विकास विभाग

मा. श्री. समीर कुर्तकोटी, (भा.प्र.से.)

माननीय आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे

श्रीमती. चंचल पाटील

माननीय सहसंचालक, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे

मेनू
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • योजना
  • संपर्क
  • प्रशासक लॉगिन
संस्थेबद्दल दृष्टी आणि कार्य

संस्थेबद्दल

स्वायत्त संस्था म्हणून भविष्यातील वाटचाल व आव्हाने

सध्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही एक महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून या संस्थेची स्थापना सन १९६२ मध्ये केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत करण्यात आली. आदिवासी विषयावरील विविध बाबींवर संशोधन करण्यासाठी देशातील काही आदिवासी बहुल राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.

या संस्थेची स्थापना करताना संस्थेचे खालील उदिष्टये निश्चित करुन देण्यात आली होती.

संस्थेची उदिष्टये व कार्ये

  • केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आदिवासी जीवनावर झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करणे.

  • आदिवासी जीवन व विकास यांचेशी संबधित विषयावर संशोधन करणे.

  • आदिवासी विकास विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचारीवृंदाकरिता सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच आदिवासी विद्यार्थ्याकरिता सेवापूर्व प्रशिक्षण राबविणे.

  • आदिवासीकरिता विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे

  • आदिवसी कला व संस्कृती जतन करण्याकरिता आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय चालविणे, हस्तकला प्रदर्शनाचे विविध शहरी भागात आयोजित करणे तसेच आदिवासी जीवनावर लघुपटाची निर्मिती करणे.

  • महाराष्ट्र राज्यात क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही गेली ५० वर्षे आदिवासी विषयाबाबत अभ्यास करणारी तसेच आदिवासी या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणारी राज्यातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेच्या कामाची नोंद घेऊन केंद्र शासनाने या संस्थेला देशातील सर्व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकरिता नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा २०१३ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला व या सुवर्ण महोत्सवाचे उदघाटन तत्कालीन राष्ट्रपती मा.श्री.प्रणब मुखर्जी यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी या आदिवासी सशोधन तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनास सल्ला व मार्गदर्शन करण्याच्या अनुषगांगने संस्थेच्या मूळ उदिष्टयांची व्याप्ती वाढवून  शासन निर्णय २४ डिसेंबर २०१३ नुसार उदिष्टये निश्चित करुन या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला.

दृष्टी आणि कार्य

स्वायत्त संस्था म्हणून उदिष्टये

या संस्थेस शासनाने स्वायत्त संस्था म्हणून घोषित करताना खालील उदिष्टये ठरवून दिलेली आहेत.

1. संशोधन
  • आदिवासींच्या विविध प्रश्नावंर /विषयांवर अभ्यास करणे.

  • उपयुक्त योजना व कालबाहय योजना यांची यादी तयार करणे व शासनास सादर करणे.

  • विद्यापीठात पी.एच.डी.संशोधनासाठी अद्यासन (चेअर) उपलब्ध करुन देणे.

  • आदिम जमातीचे सर्वेक्षण करणे व त्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करणे.

  • आदिवासींच्या सांस्कृतिक इतिहासाचे संशोधन करणे.

  • आदिवासींच्या सांस्कृतिक परंपराचे जतन करणे, त्यांच्या पारंपारिक वस्तुंसाठी म्युझियम तयार करणे.

  • आदिवासी कलांचे संशोधन व संवर्धन करणे.

2. सांस्कृतिक इतिहासाचे संशोधन करणे
  • आदिवासींच्या लोककलेचे व परंपरेचे जतन करणे.

  • आदिवासींच्या बोलीभाषेचा अभ्यास करणे व त्यांच्या बोलीभाषेवर पुस्तक निर्मिती करणे.

  • आदिवासी साहित्य निर्मितीस प्रोत्साहन देणे, नवोदित आदिवासी साहित्यिकांना त्यांच्या साहित्यांच्या प्रकाशनासाठी उत्तेजन देणे.

  • आदिवासी साहित्य संमेलन व मेळाव्याचे आयोजन करणे.

  • आदिवासींच्या विविध प्रश्नावर/विषयावर एक दर्जेदार नियतकालिक काढणे.

  • आदिवासींच्या विविध पारंपारिक न्यायिक व इतर व्यवस्थावर अभ्यास करुन रितसर संहिता तयार करणे.

  • विविध जमातीचे आदिवासी कोष निर्माण करणे.

3. प्रशिक्षण
  • आदिवासी विकास विभागातील कर्यरत अधिकारी/कर्मचारी यांना सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच इतर विभागाकडून आदिवासींच्या ज्या योजना राबविण्यात येतात त अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.

  • आदिवासी लोकांसाठी स्वयंरोजगार व उदयोगासाठी मार्गदर्शन करणे.

  • आदिवासी समाजातील युवक/युवतींना भारतीय प्रशासन सेवा भारतीय पोलीस सेवा या सेवांमध्ये प्रवेश करण्याकरिता प्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था करणे.

  • परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करणे.

  • सैनिक भरतीपूर्व व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी योजना तयार करणे व चालविणे.

  • विविध न्यायालयीन प्रकरणांसाठी व मा.सर्वोच्च न्यायालयीन प्रकरणासाठी निष्णात वकीलांची नियुक्ती करणे व याबाबतचे सर्व अधिकार स्वायत्त संस्थेतील अधिकारी यांना राहतील.

  • आदिवासी महिलांना प्रशिक्षण देणे.

उपरोक्त विविध विषयानुसार संस्थेचे कामकाज आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या देशातील व परदेशातील निरनिराळया परिषदांना, या संस्थेच्या वतीने संस्थेतील अधिकारी/कर्मचारी/संस्थेमध्ये नियुक्त करण्यात आलेले साधन व्यक्ती यांना, त्यांनी संस्थेमध्ये होत असलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने तयार केलेले विविध संबधित प्रबंध /प्रकल्प इत्यादी, देशातील अथवा परदेशातील संस्थांना या संस्थेमार्फत सादर केल्यानंतर, सदर संस्थांनी संबंधित व्यक्तींना सादरीकरणाकरिता आमंत्रित केल्यास त्यांना संस्थेच्या वतीने नामनिर्देशित करता येईल. त्याकरीता संबंधित संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या परिषदेकरिता नोंदणीकरिता येणारा प्रत्यक्ष खर्च हा संस्थेच्या वतीने करण्यात येईल. इतर बाबींसाठी येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे हे करतील.

संस्थेला स्वायत्त दर्जा देण्याचा निर्णय झाल्यानंतर संस्थेची स्वायत्त संस्था म्हणून रितसर नोंद धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे झाल्यानंतर व संस्थेच्या नियामक मंडळाच्या आतापर्यत ४ बैठका संपन्न झाल्या. या नियामक मंडळाने संमत केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक २७/३/२०१८ रोजी कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न होऊन या सर्व बेठकीत संस्थेच्या कामकाजाचे धोरण व दिशा निश्चित करण्यात आली.

  • आमचे अनुसरण करा
जोडलेले रहा
  • 020-2633 2380 / 020-26360 026

  • trti.mah@nic.in

शेवटचे अद्यावत 15 / 12 / 2022
अभ्यागत संख्या 13 / 02 / 2022
Copyright © 2022 TRTI | All Rights Reserved | Design & Developed By NiyazPathan